भावनेची अभिव्यक्ति भाषेंतूनच होते असे नाही. ती वागणुकींतूनही होते. प्रभु रामचन्द्रांना गोड बोरे खायला मिळावीत म्हणून शबरीने प्रत्येक बोर स्वतः चाखून पाहिले होते. शबरीच्या या अभिव्यक्तीपेक्षा त्यामागची भावना प्रभु रामचंद्रांच्या हृदयाला स्पर्शून गेली व ते गहिवरले असा (मी वाचलेल्या) रामायण कथेंत उल्लेख आहे. याचा अर्थ भावना अधिक शक्तिशाली (म्हणून महत्वाची) ठरते.
हेच दुसऱ्या उदाहरणांत कवितेच्या खालील ओळींवरूनही दिसून येईल. त्यांत कवि म्हणतो -
माझी मुलगी पितृमुखी झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. आता वाटतं ती मातृमुखी असती तर बरं झालं असतं. एक जिवंत स्मारक बरोबर राहिलं असतं.