ॐ, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद !
न सा सभा सन्ति न यत्र वृद्धाः ।
वृद्धाः न ते ये न वदन्ति धर्मम् ॥
धर्मो न वै यत्र नच अस्ति सत्यम् ।
सत्यं न तद् यद् छलनानुविद्धम् ॥
रामायणातला हा श्लोक सांगतो की
नसे सभा ती, जिथे न वृद्ध ।
तो वृद्ध नाही, न वदे जो धर्म ॥
तो धर्म ना, जेथ न सत्य राहे ।
ते सत्य ना, जे टिके चिकित्सेत ॥
मनोगतावर जाणते नाहीत असे शक्य नाही,
जाणते योग्य काय हे सांगू शकत नाहीत असे नाही,
योग्य असेल ते सत्य असणार नाही असे नाही, आणि
जे सत्य असेल ते लोकचिकित्सेत तावून सुलाखून बाहेर पडेलच.
तुम्ही हे लेख वाचलेत. तेव्हा ह्यावरचे प्रतिसादही वाचलेच असणार.
ह्या संकल्पनांनी आपण सारेच समृद्ध होत आहोत.
तेव्हा तुम्हीही तुमचे अनुभव सविस्तर लिहा. लोकांना आज जरी ते उपयोगी वाटले नाहीत तरी जेव्हा वाटतील तेव्हा खरोखरीच उपयोगी पडावेत अशी त्यांची मांडणी करावी ही विनंती.