"तो (विंचू) त्याचा धर्म (नांगी मारण्याचा)पाळत आहे तर मला माझा धर्म (मानवधर्म -त्याचे प्राण वाचवण्याचा)पाळायला नको का?"
या पुढे जाऊन जर त्या विंचवाला असे वाटले की आपला जीव वाचवणाऱ्याला नांगी न मारता, उगी राहून, त्याचा धर्म पाळण्यात आपल्याला मदत करता येईल आणि त्यायोगे आपलाच जीव वाचेल, तर तसे करण्याची त्याला मुभा आहेच. याचा अर्थ तो नांगी मारण्याचा 'स्वधर्म' बदलत नसून सहकार्य हा गुण आत्मसात करीत आहे. भक्ष्य मिळवण्यासाठी नांगीचा उपयोग हा त्याचा धर्म आहे.
माझे हे विचार योग्य आहेत का?
--लिखाळ.