येथील चर्चेवरून एक प्रसंग आठवला. गोळवलकर गुरुजींच्या चरित्रात वाचल्याचे स्मरते.
ते त्यांच्या काही सहकाऱ्यांसमवेत एका गरीब माणसाच्या घरी जातात. तो लगबगीने चहा टाकतो. त्याचे घर अतिशयच साधे (झोपडीवजा आणि थोडे अस्वच्छ) असते. तो तयार झालेला चहा त्याच्या मळक्या धोतराच्या पदराने गाळतो सर्वांना प्यायला देतो गुरुजी वगळता इतर लोक तो कसाबसा पितात. बाहेर आल्यावर कोणीतरी त्या चहाबद्दल विषय काढते. त्यावर गुरुजी म्हणतात की, बाबांनो तुम्ही चहा प्यायलात म्हणून तुमची अशी प्रतिक्रिया आहे. मी तर त्याने दिलेले प्रेम प्यायलो.
कथा जशी आठवली तशी लिहिली आहे. चु. भू. द्या. घ्या. अभिव्यक्तीपेक्षा भावनांकडे पाहावे (या ठिकाणी). 'दिलेले प्रेम प्यायलो.' हे महत्वाचे.

माझे मत असे की, अभिव्यक्ति आणि भावना, दोहोंचेही स्थान तारतम्याने पाहावे. एकच एक नियम सर्व प्रसंगात लागू होत नाही.

आपलाच लिखाळ.