सर्व प्रथम प्रतिसाद संतुलित आहे व धडक दोषारोप करणारा नाही.याबद्दल अभिनंदन.
स्वत:चे विचार आपण कसे आणि कुठे मांडतो त्यावर भावना महत्त्वाच्या की शुद्ध भाषेचा आग्रह महत्त्वाचा हे वाचक ठरवत असतात. हा विचार पटला.पण शुद्ध भाषेचा आग्रह धरतानाही केवळ ती(भाषा) तशी नाही म्हणून आशयाला नगण्य महत्व दिले जाते ते अयोग्य वाटते.'आधी भाषा सुधारा नंतर विचार मांडा' असं ऐकवलं जातं. मी एकंदर अभिव्यक्तीबद्दल लिहले आहे. भावना व अभिव्यक्ती(मग ती कुठेही व कशीही असो) याबद्दल भोमेकाकानी पुरणपोळी चं उदाहरण दिलय. तेच पुढे ताणलं तर....आईने केलेली पोरणपोळी कशीही झाली तरी प्रेमापोटी गोड मानली जाते /नवीन शिकणाऱ्या कन्यकेने केली तर कौतुकाने खाल्ली जाते पण ती खानावळीतल्या धोंडुताईने केली असेल तर ....शिमगा!
शुद्ध भाषेचा आग्रह असावाच.पण गम्मत म्हणून जर खेडूत भाषा वापरली तर गहजब नसावा हा माझा मुद्दा आहे.
१. शुद्धलेखना विषयी अज्ञान
२. निष्काळजीपणा आणि घाई
१.याचा विचार मी 'सर्वसाधारण'असा घेतो आहे. अधिक स्पष्ट करायचं तर जो अशुद्ध लिहतो/लिहते त्याच्या शुद्धलेखना विषयीच्या अज्ञानाबद्दल.इथे असं म्हणावंसं वाटतं की, त्याच्या/तिच्या बाबतही अन्याय होत असतो व त्या व्यक्तिस नीट समजून घेतलं जात नाही.त्याची/तिची अभिव्यक्ती तशीच असणार हे त्याच्या भावनांकडे पाहताना समजायला हवं जे होत नाही व माझ्या मापदंडात बसत नाही म्हणून त्याच्या अभिव्यक्ती कडे दुर्लक्षणार हे अयोग्य वाटते.
२. निष्काळजीपणा आणि घाई तर २१व्या शतकात पाचवीलाच पूजलेली व म्हणून तर भावना समजून घेण्याची निकड भासते. असो.
जाता जातापण महत्वाचे
मी एक मुद्दा म्हणून परिपूर्ण नसलेल्या भाषा वापरणाऱ्या विषयी विचार मांडले. मी स्वतः शुद्ध भाषेत पानेच्या पाने लिहू शकतो हे सार्थ अभिमानाने सांगतो.
दुर्लक्ष करून त्यांना चु. हु. मं. सारखी विशेषणे लावून आपण अधिक लोकांना आकर्षित करू शकता असा आपला गैरसमज नसावा असे वाटते.या वरुनच टोलेबाजीच्या नादात तुम्ही एक मुद्दा पुरवलात.माझ्या समजाची चिंता कुणी वहावी असे मला वाटत नाही. कुणाला आकर्षित करण्यासाठी असले प्रकार करावेसे मला वाटत नाहीच.मला ते वाटले असे वाटणे हाच जावई शोध आहे. चर्चा न करता केवळ टीका करणाऱ्यांसाठी चु. हु. मं. सारखी विशेषणे असतात. इतके ध्यानात आले तरी खूप झाले हो! या 'उंटावरुन शेळ्या ...' नाहीत हो!