गणितामध्ये असे अनेक मजेदार प्रकार असतात तर !!

हा विषय वाचून लेख उघडावा की न उघडावा या संभ्रमात होतो.ऍन्ड शी डज् नॉट मेक हर हॅन्ड्स् डर्टी विथ ऍप्लिकेशन्स , लोग पूछते है इश्कसे क्या फायदा... मैं पूछता हूं फायदेसे क्या फायदा हे वाचले आणि उघडल्याचे सार्थक झाले! फारच छान!
रावसहेबांशी सहमत.

शरदरावांचे, त्यांनी दाखवलेल्या सौंदर्यस्थळाबद्दल आभार.
 
आता माझ्याकडूनही एक बाळबोध मजा,
नवाच्या पाढ्याची मजा --
९   = ९     = ९
१८ = १+८ = ९
२७ = २+७ = ९
३६ = ६+३ = ९
४५ = ४+५ = ९
५४ = ५+४ = ९
६३ = ६+३ = ९
७२ = ७+२ = ९
८१ = ८+१ = ९
९० = ९+० = ९
 
-- (गणितात कच्चा) लिखाळ.