मी अनुभवलेले काही,
- मराठी संस्कृती, भाषा आणि कला यांच्याशी बेळगाव शहर आणि परिसरातील लोकांचे जुने आणि (अजूनही) घनिष्ट संबंध आहेत.
- बेळगाव शहर आणि आजूबाजूच्या शहरात निर्विवादपणे मराठी बहुसंख्य आहेत. (बेळगाव महानगरपालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत असते.)
- एक नोव्हेंबर हा "काळा दिन" म्हणून पाळला जातो.
- रस्त्यावर मुख्यत्वे मराठीच बोलली जाते.
- बहुसंख्य दुकानांचे बोर्डही मराठीत आहेत.
- शाळांमध्ये कन्नड हा सक्तीचा विषय आहे. (महाराष्ट्रात मराठीची सक्ती नाही असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.)
- महाराष्ट्रात जाण्याविषयीची चळवळ राजकीय कमी आणि सामाजिक जास्त आहे.
सध्या मात्र महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोकांच्या उदासीनतेला कंटाळून सीमाभागातील जनता जे आहे ते, आहे त्या अवस्थेत स्वीकारायला लागली आहे.