१. आपले पहिले विधान काही अंशी बरोबर असले तरी सरसकट विधान करणे तेवढे योग्य होणार नाही. दुसरी भाषा उजव्या मेंदूची केंद्रे जागृत करते . त्याने उजवा व डावा असे दोन्ही मेंदू अधिक काम करतात हा संशोधनाचा निष्कर्ष आहे. दोन किंवा तीन भाषा बोलणाऱ्या मुलांची तर्कशक्ती, नव्या गोष्टीचे ग्रहण व आकलन जास्त असते असे आढळून आले आहे. त्यामुळे ती मुले शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होतात असे अनुमान आहे.जे संशोधन केले गेले त्यासाठी तुलनात्मकरित्या समान असा मुलांचा वर्ग घेण्यात आला असावा असे वाटते.
दोन भाषांचेच उदाहरण घेण्यासाठी सीमाप्रांत कशाला? सीमाप्रांतातली मुले पुढे नाहीत म्हणजे ती हुशार नाहीत असे अनुमान योग्य वाटत नाहीत, यशस्वी होण्याकरता केवळ दोन भाषांपेक्षा आणखी कित्येक गोष्टींची गरज असते. जन्मजात बुद्धिमत्ता, पालकांचे श्रम व जागरुकता, पाल्याचे अवधान इत्यादी.
महाराष्ट्राच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमापेक्षा केंद्रीय अभ्यासक्रम जास्त अवघड असतो यावर दुमत असू नये. त्यात मुलांना हिंदी, प्रांतीय व इंग्रजी अशा तीन भाषा शिकवतात. महाराष्ट्रात अशा अभ्यासक्रमाच्या शाळा कमी आहेत. पण कित्येक राज्यात त्या अभ्यासक्रमाचा अवलंब केला जातो. सीमाप्रांतही याला अपवाद नाही. आय आय टी व इतर प्रादेशिक महाविद्यालयात येणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा नेहमी फायदा होतो, त्यांची दहावी/ बारावीची टक्केवारी महाराष्ट्र बोर्डाच्या विदयार्थ्यांपेक्षा कमी असली तरी अशा परीक्षांमध्ये द्वैभाषिक मुले चांगले यश मिळवतात. त्यावरून तरी दोन भाषांनी मुलांचे नुकसान होते असे वाटत नाही.
मुंबईत विविध मातृभाषा बोलणारे लोक आहेत. अशी मुले साधारणतः ४ भाषा शिकतात. आज महाराष्ट्रातली शालांत परीक्षा घेतली तर मुंबई बोर्डाची गुणवत्ता टक्केवारीत सर्वात जास्त असते. एवढे उदाहरण पुरेसे असावे. सीमाप्रांतातली मुले पुढे जात नाहीत यात थोडे तथ्य असले तरी त्याची इतर कारणे असावीत असे वाटते.
२. आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीत जाणारी मुले तेवढीच प्रगल्भ असतात. याआधीच्या दोन पिढ्या एकाचित संमिश्र यश देणाऱ्या असतील. पंण संगणक युगात या पिढीला व पुढील पिढीला दोन भाषांनी मदतच होते आहे असे वाटते.
३. दोन किंवा तीन भाषा बोलणाऱ्या मुलांची तर्कशक्ती, नव्या गोष्टीचे ग्रहण व आकलन जास्त असते असे आढळून आले आहे. त्यामुळे ती मुले शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होतात असे अनुमान आहे. मनोगतावरील द्वैभाषिक मुलांच्या पालकांनी आपली मते द्यावी , एक पडताळा घेता येईल.