मी जेव्हा मुंबईत जातो तेव्हा वातावरणात सर्वत्र एक उर्जा असल्याचा भास होतो

पुण्यात असल्यावर या शहराच्या संस्कृतीचा आणि ती संस्कृती निर्माण आणि सांभाळ करण्याच्या जवाबदारीचं जे भान पुण्याला आहे

मुंबई आणि पुणे ह्या शहरांचा विकास झाला तो मुख्यतः राज्यकर्त्यांनी त्यांची निवड मुख्य स्थान म्हणून केली म्हणून झाला असे वाटते. मुंबईतले ऊर्जावान किंवा पुण्यातले संस्कृतिभान (म्हणजे संस्कृतीचे भान आहे ज्यांना) लोक हे काही त्या त्या शहरांचे भले करायला तेथे गेले नाहीत. अशोकाच्या वेळेपासून मुंबई परिसरात असलेल्यांचे (असले तर) काही वंशज सोडले, तर बहुतांश मुंबईकर तेथे उपजीविकेसाठी म्हणजे आपापल्या गावात उपजीविका होत नाही म्हणून गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या त्यांच्या परिसराचा तुम्ही म्हणता तसा विकास झाला नाही, म्हणून खरे तर मुंबई पुण्यासारख्या शहरांचा विकास झाला असे काहीसे विचित्र अनुमान काढण्याचा मोहही एखाद्याला होऊ शकेल!

मुळात विकास म्हणजे काय ह्यापासून सुरुवात करता येईल. विकासाचे घटक मोजताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थाची गणना करायला विसरू नये असे वाटते.