पायथागोरसचा सिद्धांत माहीत असणाऱ्यांना खालील गणिती संबंध परिचयाचा आहे -
३ चा वर्ग + ४ चा वर्ग = ५ चा वर्ग
एक फारसा माहीत नसलेला संबंध -
३ चा घन + ४ चा घन + ५ चा घन = ६ चा घन
आणखी एक निरीक्षण
कुठल्याही संख्येचा पाचवा घात केल्यास मूळ संख्येचा एकं स्थानचा अंक व पाचव्या घातांतील एकं स्थानचा अंक नेहमीच सारखा असतो. पहा
० चा पाचवा घात ०
१ चा पाचवा घात १
२ चा पाचवा घात ३२
३ चा पाचवा घात २४३
४ चा पाचवा घात १०२४
५ चा पाचवा घात ३१२५
६ चा पाचवा घात ७७७६
७ चा पाचवा घात १६८०७
८ चा पाचवा घात ३२७६८
९ चा पाचवा घात ५९०४९
(असा संबंध घातांक १ ते ४ च्या बाबतींत आढळून येत नाही)