हा खरंच खूपच चांगला विषय आहे. खरंतर प्रत्येक भाग हा विकसीत व्हायला हवा. राजकीय नेतृत्व आपल्यातूनच उदयाला येत असत. त्यासाठी लागते इच्छाशक्ती. मला वाटत आता थोडे आशेचे किरण दिसत आहेत. बोईंग येत आहे तिकडे. यासाठी जितके राजकीय प्रयत्न झाले त्याला या भागासाठी काही तरी करायची ३ महाभागांची इच्छाशक्ती कारणीभूत आहे. त्यातले एक खुद्द बोईंग मध्ये उच्च पदावर आहेत. असा विकास झाला तर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जरा जास्त मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकेल.