मिलिन्दा,
"चातुर्वर्ण्यं मया सृष्टं" मध्ये उल्लेखिलेले ब्राह्मण हे ऋषि वा ऋषितुल्य होते. ते जे विद्यादान करीत ते आत्मज्ञान. आपण जे विद्याग्रहण करता वा विद्यादान करता ते भौतिक वा संसारोपयोगी विज्ञान. क्षत्रिय जर रणभूमिवर झुरळं मारण्यासाठी जात असतील आणि तसे करून जनरक्षण, राष्ट्र रक्षण होत असेल तर आपण निसंशय क्षत्रियही आहात. ब्राह्मणांजवळ ब्राह्मतेज होते , क्षत्रिय क्षात्रतेज बाळगून असत. विश्वामित्र जेव्हां बळजबरीने वसिष्टाची नंदिनी नामक गाय नेण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्या गाईने स्वबळाने विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा पाडाव केला. काहीतरी लिहीत नाही source देतो. महाभारत, आदिपर्व अध्याय १६५. विश्वामित्र हताश होऊन म्हणाला " धिग्बलं क्षत्रियबलं , ब्रह्मतेजो बलंबलम् " क्षत्रियबलाचा धिःकार असो, खरे तेज ब्रह्मतेजच. रातोरात त्याने राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्येला सुरुवात केली. पण मुळात क्षत्रियाचे गुण अंगी असल्याने त्याला परधर्म असलेल्या ब्राह्मण धर्मात स्थित्यंतर होण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले. असे कष्ट साधारण माणसाला झेपण्यासारखे नाहीत म्हणून परधर्म प्रवेश हा भयावह म्हटलेला आहे. आणि ह्याअर्थाने कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला हेच मला सांगावयाचे आहे. माझे लिहिण्याचा जो प्रयत्न आहे तो चर्चेचा जो विषय आहे त्याला धरून आहे. पण समग्र प्रतिसाद न बघता मध्येच एक ओळ घेऊन त्यावर शंका/आक्षेप घेणे होते आहे असे मला वाटते. आक्षेपच असेल तर दीर्घ कष्टाविना आपल्या स्वभावानुरूप असलेला स्वधर्म सोडून परधर्म-प्रवेश अगदी सोपा आहे आणि त्यात भयावह असे काही नाही हे पटविण्याचा प्रयत्न करा ना ?
आता मी मुळात वैश्य असल्याने क्षत्रियांची "भयावह" कामे करणार नाही असे ठरवले, तर घरची झुरळे मारायला क्षत्रियाला कुठून बोलावून आणू रोज ?
वर जे आपण म्हटले आहे ते म्हणजे काहीतरी तोंडावर फेकून गप्प करण्याच्या प्रयत्नासारखे आहे. उगीच कुठेतरी फाटे फोडण्यापेक्षा शास्त्रात नुसत्या भाकडकथाच आहेत आणि चर्चेसाठी घेतलेला विषय देखील त्या भकडकथांपैकीच एक होय असे म्हणा ना. मग माझे काहीच म्हणणे नाही.