गणितांत शून्याने भागता येत नाही. ती चूक वरील उदाहरणांत केली आहे. त्यांत अ=ब असल्यामुळे अ-ब ची किंमत शून्य होते. तो सामायिक गुणक म्हणून दोन्ही बाजूंकडून काढून टाकणे म्हणजे शून्याने भागण्यासारखे आहे. तसे केल्यास अनेक चुकीची उत्तरे निघू शकतात. उदाहरणार्थ,

०*२ = ० व ०*३ = ० याचा अर्थ ०*२ व०*३ हे गुणाकार प्रत्येकी शून्य असल्यामुळे समान आहेत. म्हणून ०*२ = ०*३. समीकरणाच्या दोन्ही बाजूतून  शून्य हा सामायिक अवयव काढून टाकल्यास २ = ३ असे दिसते.