भावनांचा कल्लोळ नाही
विचाराचं मोहोळ नाही
डोक्यात कसला म्हणजे
कसलाच घोळ नाही
ईतकी शांतता की मी
चाचपुन बघते
माझंच अस्तित्व पुन्हा पुन्हा ...
माझ्या जिवन्तपणाच्या
त्या जुन्या खुणा ..
संथ लयीत, साध्या शब्दांत मनाची रिक्तता, रिक्त शांतता छान व्यक्त झाली आहे. कविता आवडली.
शुभेच्छा.
चित्तरंजन