हे घ्या अजुन एक......

सोनु तुला सोन्याची माळ घे,

सोन्यापरि लेडीज घड्याळ घे,

टेरीकॉटची साडी घे गोल गोल,

आतातरी माझ्याशी गोड बोल,

सोनु आपण लई करु मज्जा,(थांब होउदे सकाळ........)२

सोनु तुझी आई आहे काळी,

काळीला आवडते पोळी,

पोळीचा आकार कसा गोल गोल,

आतातरी माझ्याशी गोड बोल,

सोनु आपण लई करु मज्जा,(थांब होउदे सकाळ........)२

सोनु तुझा बापुस आहे टकल्या,

टकल्याला आवडतात चकल्या,

चकल्यांचा आकार कसा गोल गोल,

आतातरी माझ्याशी गोड बोल,

सोनु आपण लई करु मज्जा,(थांब होउदे सकाळ........)२

सोनु आपण चौपाटीवर जायचं,

चौपाटीवर भेळपुरी खायचं,

पुरीचा आकार कसा गोल गोल,

आतातरी माझ्याशी गोड बोल,

सोनु आपण लई करु मज्जा,(थांब होउदे सकाळ........)२