मला माहीत असलेली ही आणखी दोन गाणी -

चाळीतील चौकाची बिघडली हवा
आतून अन् बहेरून रंग द्या नवा ॥

पायरी ती एकही न धड मोडके जिने
हादरती कठडे अन् खांब लटपटे
पॅसेजसाठी नवीन ग्लोब मागवा ॥

चौकातच वरणभात वरून फेकती
अंड्याची टरफलेही त्यामध्ये किती
थुंकतीही वरून सुजन, त्यास थांबवा ॥

बसुनि अशा नरकातच जाऊ मी कसा?
गाण्यातून स्वर्ग उभा करू तरी कसा?
गवया आधी तुम्ही, भंग्यास बोलवा !!

आनंदाचे डोही आनंद तरंग च्या चालीवर सामंत ब्रदर्स ची जाहिरात म्हणणे -

सामंतांचे लोणी सामंतांचे तूप
उत्तम श्रीखंड, सामंतांचे ।

जंजिरा, सुशीला वगैरे ओळखीची गाणी वाचताना मजा आली. आठवणी जाग्या झाल्या.