डर चित्रपटातील 'जादू तेरी नजर' हे गाणं 'ओम जय जगदीश हरे' च्या चालीवर म्हणणे..

"झूट बोले कौआ काटे" हे गाणंही असंच "जय जगदीश हरे"च्या चालीवर छान म्हणता येतं.

"जॅक अँड जिल" हे गाणं तर बऱ्याच वेगवेगळ्या चालींवर म्हणता येतं. वानगीदाखल...

१. "जागृति" मधलं "आओ बच्चों तुम्हें दिखा दूँ झाँकी हिन्दुस्तान की" (त्यातल्या "वन्दे मातरम्, वन्दे मातरम्" सकट).
२. "दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है".
३. "ये मौसम रंगीन समा, ठहर ज़रा ओ जानेजा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है, तो फिर कैसा शरमाना".
४. "श्री ४२०" मधलं "प्यार हुआ इक़रार हुआ".
५. ABBA चं "Chiquitita".

तसंच, "बा बा ब्लॅक शीप" हे "ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्ताँ" (सोलो आवृत्ती)च्या चालीवर.

किंवा "हंप्टी डंप्टी" हे "नीले नीले अंबर पे चाँद जब आए*"च्या चालीवर. (इथे गाण्याच्या धृपदाची चाल एकदम फिट्ट बसते. शिवाय, त्या "प्यासा प्यासा अंबर" वगैरे कडव्यांच्या चालीतसुद्धा बसवायचं असेल, तर "हंप्टी डंप्टी"च्या पहिल्या दोन ओळींत "हंप्टी डंप्टी सॅट ऑन अ वॉल वन डे, हंप्टी डंप्टी हॅड अ ग्रेट फ़ॉल दॅट डे" असा [storytelling styleमध्ये] फेरफार करून घ्यावा. छान जमतं!)

*तशी "नीले नीले अंबर पे"ची चालसुद्धा एका तमिळ गाण्यावरून उचललेली आहे. मग आपण तीच चाल उचलून "हंप्टी डंप्टी"ला लावली, तर बिघडलं कुठे?