मित्रहो,
मृदुलाताईंनी मला फ़र्माच्या सिद्धांताची आठवण करून दिली.
दुर्दैवाने कोड्याचे उत्तर फ़र्माच्या वहीच्या मार्जिनात मावण्याइतके लहान असल्यामुळे काही हिंट देणे शक्य होणार नाही.
पण प्रयत्नांना उत्तेजन मिळावे म्हणून काही उत्तरसंच खाली देत आहे -
        २३४०,३२७६,४६८
        १०६१४८,६८६८४,६२४४
        २६४५३१९८२,५५५५१७१६२२,२०३४८६१४
(क्षणभर, आता उत्तर फुटले की काय या विचाराने माझ्या काळजात धडधड वाढली. तसे नसावे अशी आशा करतो आहे. ह्या हिंट प्रकरणात हाच मोठा प्रॉब्लेम आहे.)
हिंट मिळो न मिळो, निदान या कोड्याला उत्तरच नाही असा कोणाला संशय आला असेल तर तो तरी दूर व्हावा.
तेव्हा - लगे रहो, मुन्नाभाय!
दिगम्भा