माझ्याकडे आता मृत्युंजय नसल्याने मी सुप्रियाबद्दल काही सांगू शकत नाही. हे पुस्तक ज्यांच्याकडे आहे ते यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
कर्ण हा कौंतेय होता हे जर उघड झाले असते तर तिला कर्ण हा एक पांडव म्हणून मान्य करावा लागला असता.
कर्ण कौंतेय होऊ शकतो. पांडव नाही कारण तो पंडु पुत्र नाही. पंडु किंवा कुरु घराण्याशी त्याचा कसलाही संबंध नाही. त्या अनुषंगाने तो कधीही धर्माच्या वरचढ होऊन सम्राटही होऊ शकत नाही फारतर मोठा भाऊ होऊ शकतो.