वेदश्री,
बरोबर व अभिनंदन.

तुमच्याकडून अभिनंदन पाहून खूप आनंद झाला. :-)

पण.. अरेरे, मी एवढे प्रयत्न करूनही शेवटी माझ्या हातून उत्तर फुटलेच ना.

उत्तर कुठे फुटलं आहे? जनरलाईज उत्तर कसं मिळवायचं हे कुठे मी सांगितलं आहे?

धिक्कार असो माझा!

हे तीन शब्द वाचून वाईट वाटलं. असं तर काही अपेक्षित नव्हतं मला.. काही चुकलं असल्यास रागवा पण असं बोलू नका.

(स्वगत - छेछे, हिंट देण्याचा हा मोह यापुढे टाळलाच पाहिजे)

तुमचं स्वगत हेरलंय आम्ही ! आता पुढच्या आव्हानाला ( जे तुम्ही लवकरच द्याल अशी आशा आहे ! ) आम्ही तुमच्या हिंटेच्या ढालीशिवाय सामोरं जायचा प्रयत्न करू. तसा प्रयत्न याहीवेळेस केला होता म्हणा ( काऽऽय धमाल मजा आली सोडवासोडवीमध्ये या कोड्याच्या... ! ) पण.... असो.

(दुःखी)
दिगम्भा

दुःख घालवण्यासाठी एक कोडं विचारू का? :D