कशाचा कशाला ताळमेळ लागत नाही. सगळेजण आपला फायदा कसा होईल हे बघण्यात गुंतलेले असतात. ज्या भागात पाण्याची टंचाई असते अशा भागात उसाची लागवड कशासाठी ?? हे लोक वेगळ्या विदर्भाची मागणी करतात पण वेगळे झाल्यावरही यांच्या समस्या सुटणार आहेत का ? मंत्री लोक अक्षरशः मलई खाण्यात मग्न असतात. आपले सरकार आपल्या लोकांची काळजी का करत नाही ??

उद्या ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांची जमीन नक्कीच हडपली जाईल आणि तिथे उभी राहतील मोठी संकुले ! अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तर उद्या आपणही इतर देशांप्रमाणे अन्न आयात करायचे ? ते दिवस दूर नाहीत जेव्हा आपल्याला निकृष्ट दर्जाचे, सत्त्व काढून घेतलेले अन्नपदार्थ खावे लागतील.

हे चित्र कधी बदलणार ? यावर तोडगा काय ?