कोहम् ,
पलायनवादी मध्यमवर्गीयांची असहायता व्यक्त करणारी आशयगर्भ कविता!

राहिलेली कसर पूर्ण केली
सनईच्या सुरांनी........
हे मात्र कळले नाही. ही कविता प्रथमपुरुषी एकवचनी
आहे.त्यामुळे 'सनईच्या सुरांनी' पुरुषाच्या स्वातंत्र्या(!) वर बंधने  येतात व ते सूर,त्यात अपेक्षीत असलेली 'एकनिष्ठता' ही जर 'बेडी' वाटू लागली तर मग ह्या ओळी या कवितेच्या एकंदर आशयाशी विसंगत वाटतात.
माझ्या समजूतीत काही चूक होत असेल त्यामुळे स्पष्टीकरण आल्यास बरे होईल.
जयन्ता५२