नंदन,
माझी 'सांत्वन' ही कविता याच विषयावर आहे. ह्या कवितेनंतर याच विषयावरचे इतर लिखाण (गद्य/पद्य) मनोगतवर येईल असे वाटले होते. ( जाउ द्या, समाजाला शेतकऱ्यांच्या राखे पेक्षा 'राखी सावंत' मध्ये जास्त आस्था आहे!) असो,माझी अपेक्षा आज या लेखमालेने पूर्ण झाली.'रोज मरे त्याला कोण रडे' यातील 'रोज मरे' हे अक्षरशः खरे करणाऱ्या या आत्महत्या बरोबरच आता 'कोण रडे' हेही दुर्दैवाने खरे ठरत आहे.
महाराष्ट्रात २००० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे वाचल्यावर मन सुन्न होते.
या लेखात याच विषयाची व्यावहारिक पातळीवर उत्तम समिक्षा केली आहे.
धन्यवाद!
जयन्ता५२