मिलिन्दा,
         सर्वप्रथम ' तोंडावर काहीतरी फेंकणे ' वगैरे शब्दप्रयोग केल्याबद्दल क्षमस्व. आपण म्हणता प्रत्यक्षात जुनी शास्त्रे बरीचशी "आभासी" (ऍब्स्ट्रॅक्ट) आहेत. हे तर तुम्हीही मान्य कराल. त्यामुळे त्याचे "इन्स्टन्शिएशन" ही नेहमीच सध्याच्या परिस्थितीत होत असते.
        प्राचीन तत्त्वज्ञान (औपनिषदिक काळ) जो आपल्या संस्कृतीचा आधार आहे, त्याकडे बघितले तर असे दिसून येईल की ती मुळात समजण्यास कठीण, अगदी त्याकाळी सुद्धा. ईशावास्य उप. मधला फक्त पहिला श्लोकच तत्त्वतः समजण्यासाठी शेकडो (जादा बोल दिया क्या ? ) पुस्तके लिहिली वाचली जातात. अशी ही तत्त्वे आपापल्या समजली नाही तर ती आपल्यासाठी abstract. म्हणून ती तत्त्वे विशद करण्यासाठी आपल्याकडे कीर्तन, प्रवचन ही व्यवस्था आहे. seminars , workshops कशासाठी असतात ? तसेच. आपण परदेशी आहात म्हणून लाभ घेता येणार नाही, ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग समजवण्यासाठी सातारकर बुवांची प्रवचने (सकाळी ETV वर) बरेच दिवसांपासून चालली आहेत. साधे १४ अभंग लोकांना कळू नयेत. मग ऐकणारे रिकामटेकडे म्हणून बघतात का ETV ला दुसरा उद्योग नाही म्हणून.
          दुसरे म्हणजे शास्त्रांतील तत्त्वे अभ्यासून, अनुभव घेऊन जाणावी लागतात. मी एक साधा प्रश्न विचारू ? साखर गोड लागते म्हणजे काय हो ? ती गोड असते हेच मला मान्य नाही, मग कोणतीही उपाधी न वापरता जरा वर्णन करून समजवाल ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला ? चिमूटभर तोंडात टाकून बघा.  आता कोणी म्हणेल उदाहरणच चुकीचे. ठीक चुकीचे तर चुकीचे. वेगळा मुद्दा समजा हवे तर. पण साखर गोड असते हे पटवाल का ? 
         आपण सूज्ञ आहात. पटले तर ठीक, नाहीतर सोडून द्या.
मी फक्त आपल्या संस्कृती/धर्म ह्यांतील तत्त्वांबद्दल लिहितोय. प्रत्येक क्षेत्रात Laws असतात तसेच practices ही असतात. उदा - सती वगैरे प्रथांना ऋग्वेदकाळी आधार सापडत नाही