इथे या संकेतस्थळावर हे असे लिहिणे कृत्रिम नाही का वाटत

हो वाटते. पण मनोगतावर मराठी पद्धतीने राव, पंत किंवा नुसतेच संबोधनात नाव/ आडनाव असे सहसा वापरले जाते असे दिसते. स्त्रीसदस्यांना हाकारायला मात्र मलाही सुरुवातीला अवघड गेले. मला स्वतःला मृदुलाबाई, मृदुलाताई वगैरे ऐकायला (खरे म्हणजे वाचायला) खटकते मग मी कुणाला काय म्हणू? असा प्रश्न पडायचा. पण आता सवय झाली आहे. शेवटी (सवय) केल्याने होत आहे रे! :-)