वरच्या उदाहरणातली मूळ भावना किंवा आशयच अति भाबडा आणि बटबटीत आहे. कुठल्याही कलाकृतीचा आशय, विषय त्याच्या रचनेवर अवलंबून असतो. कुणी एक माणूस चित्र काढतो त्याचा हात चांगला नसेल तर त्याला काय म्हणायचेय ते कसे पोचणार?
मुळात अभिव्यक्ती कशासाठी होते? किंवा तुम्ही का लिहिता? कोणीतरी वाचावे म्हणूनच ना? कि स्वान्त सुखाय? तसे असेल तर इतर कोण दुर्लक्ष करत असेल तर तुमची तक्रार असता कामा नये. पण तुमची तक्रार दिसतेय म्हणजेच कुणीतरी वाचावे ही अपेक्षा गृहित धरायला हरकत नाही. मग कुणीतरी वाचायचे असेल तर त्या कुणीतरींना ते पूर्णपणे कळण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी जे माध्यम वापरताय ते काही ठराविक नियमांवर आधारीत असायला नको का? अभिव्यक्ती हे माध्यम आहे पोचवण्याचे. त्याचे नितिनियम कुठेतरी पाळावेच लागणार.
दुसरं एक म्हणजे कुणी लिहिताना ग्रामीण ढंगात म्हणून आनि/पानि/लोनी म्हणून गेला तर कुणाला खटकत नाही हो. पण तुम्ही एखादे अभ्यासपूर्ण लेखन करत असाल, चर्चा करत असाल तर ते खटकते. मग त्या अशुद्धतेचा सोस असल्याचा वास येतो.
बघा.. पटलं तर घ्या नाहितर सोडून द्या..
नीरजा