मिलिन्दा, 
         "गोड" म्हणजे काय, हे समजले, तर साखर गोड असते हे मान्य होईल.
         मग ह्याच्यापलिकडे आम्हाला तरी काही म्हणायचे आहे का ? सर्वार्थाने समजले केव्हां म्हणू शकतो ?  जीवशास्त्र हा आपला प्रांत नसतांना शोधाशोध करून आणखी थोडे वस्तु ज्ञान गोळा केले. आणखी इतरांनी घेतलेल्या अनुभवाशी ते ताडून बघितले. तोंडात टाकून स्वतःही अनुभव घेतला. मग पूर्णतया खात्री झाली की आता मला 'गोड' म्हणजे काय हे पक्के समजले आहे. मगच ध्यानात येते की हे सर्व होईपर्यंत मी 'गोड' म्हणजे काहीतरी abstract समजत होतो व आता ते abstract नसून त्यात तथ्य आहे. मग शास्त्रात आलेली तत्त्वे सर्वार्थाने ज्ञात होईपर्यंतच ती abstract. आता ती मला समजली नाहीत, मी ती पुरेशी अभ्यासिली नाहीत व अनुभवली नाहीत, थोडक्यात मी त्याची सर्वार्थाने जाण करून घेतली नाही तर ती माझ्यातली कमतरता म्हणायचे का ती abstract आहेत व 'सद्य काळात ती उपयुक्त' नाहीत असे म्हणायचे.
       मिलिन्दा, आता तू काय म्हणतोस ते चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी हा उहापोह करतोय असे समजू नये. abstract  आणि तथ्य ह्याबद्दल माझ्या मतिप्रमाणे मी विचार मांडतोय. ह्यावर मी आणखी चर्चा करणे म्हणजे हेकेखोरी करण्यासारखे होईल, तेव्हां हा विषय आता माझ्यासाठी संपला.