टग्याजी,
       कोणी तूप 'ओरपू' लागला तर तिथे ओरपण्याची वासना वा त्या पदार्थातली आसक्ती ही चित्त वृत्ति शुद्धिसाठी घातक हे मला वाटते विस्तृतपणे दाखवले गेले आहे (आणि जे व्यवहारातील उदाहरणाचे तात्पर्य आहे). तूप ओरपणारा - आणखी जास्त स्पष्टपणे म्हणायचे तर कोणत्याही वस्तूची आसक्ति असणारा - तो सात्त्विक अशी पुष्टी केलेली आपल्याला दिसली का ?  
      शेवटी दिसून येणारा गुणधर्म हा सेवन करणाऱ्या मनुष्याचा असतो, मद्याचा नव्हे. मद्य हे by itself neutral असतं.)
हा निष्कर्श आपल्या अनुभवाचा भाग असेल तर गोष्ट वेगळी. लोणी आणि मद्य हे neutral गुणधर्म असलेल्या वस्तू आहेत का ? आणि बहुतांशी लोकांचा असाच अनुभव आहे कां ? आपल्याला खरोखरच जाणून घ्यायची ओढ असेल तर ह्यावर मी एवढेच म्हणेन की आपण कृपया गीता अध्याय १७ श्लोक ७,८,९ व त्यावरची commentary पहा. मला ज्ञानेश्वरी आवडते म्हणून मी ह्या श्लोकावरच्या त्यांच्या ओव्या पहाण्याचा आग्रह करीन. कारण त्या सगळ्याचा विस्तार इतका आहे की त्याला नुसता एक स्वतंत्र लेख नव्हे त्याचे २-३ भागही करावे लागतील. प्रतिसादातून हे सर्व देणे शक्य नाही.