आज शनिवार आहे म्हणून आज कोडं लिहिलं तर ते किमान दोन दिवस तरी कोडं राहील असं वाटलं होतं पण मगाशी दिगम्भांना 'कोण कोण आलंय' मध्ये पाहिलं आणि माझ्या या फुटकळ प्रयत्नाबद्दल माझंच मला हसू आलं. दिगम्भांनी बरोबर उत्तर दिलं आहे. त्यांचं अभिनंदन करू धजावत नाहीये.. कारण त्यांचं दुःखं तसूभरही कमी झालेलं नाहीये म्हणे ! :-( नविन कोडं आठवायला पाहिजे म्हणजे आता..