तुम्ही चर्चा पुन्हा मार्गी लावली हे पाहून बरे वाटले.

ती चर्चा एवढी वाहवत गेली की विचारता सोय नाही.  जसे एखादे युद्ध चालू असताना दोन परस्पर योद्धे एकमेकांशी लढता लढता रणांगणापासून दूर लढत बसले आणि इकडे युद्ध संपून बराच काळ लोटला तरी हे आपापसात लढतच बसले अशी अवस्था झाली चर्चेची.

असो आपण स्वधर्माचे चांगले स्पष्टीकरण दिले आहे.

पण तरीही ज्याला सद्-विवेकबुद्धी आहे त्याने दुसऱ्याचे चांगले गुण घेणे काय वाईट आहे ? मी इथे असे म्हणत नाही की स्वधर्माचा त्याग करून दुसऱ्याचे गुण अंगी बनावेत.  याचे संदर्भांसहित स्पष्टीकरण दिले तर उत्तमच ! धन्यवाद !!

- मोरू