असो आपण स्वधर्माचे चांगले स्पष्टीकरण दिले आहे. >>
हे स्पष्टीकरण स्वतः श्रीकृष्णाने गीतेत लिहून ठेवलेले आहे.
आणि विनोबांनी त्याचा अर्थ अद्यकालीन सोप्या मराठीत सांगितलेला आहे.
माझा भाग एवढाच की मी ते आपल्या सर्वांकरीता इथे लिहीले.
तेव्हा ज्ञानेश्वरांच्याच भाषेत असे म्हणावे लागेल की-

'मेघ सिंधूचे पाणी वाहे । परी जग तयातेची पाहे ॥
का उमपते नोहे । ठाकते कोण्हा ॥'

पण तरीही ज्याला सद्-विवेकबुद्धी आहे त्याने दुसऱ्याचे चांगले गुण घेणे काय वाईट आहे ? >>
मुळीच नाही. जन्मप्राप्त, देशकालपरिस्थितीप्राप्त, निसर्गदत्त सद् वर्तन (कर्तव्यपालन) म्हणजेच स्वधर्म अशी माझी समजूत आहे. वैद्य नक्की विचारतील की "सद् वर्तन (कर्तव्यपालन)" म्हणजे हो काय? ह्याचे उत्तर ज्याच्या त्याच्या सद् सद् विवेकाने द्यायचे आहे. 

जो स्वधर्म आहे त्याची वाट इतरांनी काय म्हणून ठरवावी?