सहसा पूर्णवेळ किंवा अर्धवेळही 'वेळ काढून' समाजकार्य करणे शक्य होत नाही. त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो अशी एक चर्चा पूर्वी झाली होती. शिवाय कोंबडीताईंनी खारीचा की सिंहाचा वाटा अशी एक चर्चा घडवून आणली होती. मनोगती काय काय करतात, त्यांना काय काय करावेसे वाटते हे तिथे वाचायला मिळेल. :-)

तुमच्या प्रश्नांची उत्तरे:

१. समाजकार्य हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. कोणाला काय करावेसे वाटेल काही सांगता येत नाही. यात कोण श्रीमंत, कोण गरीब याला काही महत्त्व नाही. तुम्हाला काय केल्याने समाजाला मदत होते आहे असे वाटते याला आहे. उदा. माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीला धर्मांतरे घडवून आणणे हे मोठे समाजकार्य आहे असे वाटते तर माझ्या मैत्रिणीला लोकांना देवबिव काही नसतो हे पटवून देणे हेच खरे समाजकार्य आहे असे वाटते. आपण ज्यांना मदत करतो आहोत त्यांना त्या मदतीची आवश्यकता आहे का हे तेव्हढे पाहावे म्हणजे झाले.

२. अगदी सोपे उत्तर. पैशापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे तुमचा वेळ. दिवसातले, महिन्यातले किंवा वर्षातले काही तास तुम्ही 'लोकांना मदत' करण्यात घालवले तर ते समाजकार्य होईल.

३, ४, ५. उपलब्ध वेळेनुसार, निधीनुसार शेकडो पर्याय मिळतील. तुम्हाला कोणत्या प्रश्नाविषयी आच वाटते त्याप्रमाणे निवडा. यात तुम्ही तरुण आहात की वृद्ध याचा काहीएक संबंध नाही असे वाटते. पण जर पूर्ण विचार न करता केवळ काहीतरी करायचे म्हणून केलेत तर त्याने समाधान मिळेलच असे नाही. परदेशातही तुमच्या भोवती समाज असतोच. त्यामुळे देशात की परदेशात असा त्यामुळे काही फरक पडायला नको.