महेश, आत्मा अमर असतो ह्या आपल्या देशातील मूळ तत्त्वज्ञानाची ती प्रच्छन्न अभिव्यक्ती आहे. आदी शंकराचार्य म्हणतातः

यद् स्वप्न जागर सुषुप्तम् वैति नित्यं, तद् ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः

मनुष्य स्वप्नावस्थेत, जागेपणी अथवा झोपेतही (अवस्था/स्थिती) जाणत असतो. झोपेतही शरीरास मुंगी चावली तर शरीर प्रतिक्षिप्त हालचाली आपोआप करते. शरीरातील जो भाग हे ज्ञान राखतो तो आत्मा. तो निष्कल ब्रह्म. तो म्हणजे भू-जल-तेज-समीर-ख ह्या पंचमहाभूतांचा संघ नव्हे. त्यापलीकडचे काहीतरी. ह्या अर्थाने.

मात्र, मला असे वाटते की सर्व सजीवांप्रती मनुष्याची वर्तणूक समत्वाची राहावी, ममत्वाची राहावी, सहजीवनाची राहावी म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाने सर्व सजीवांचे अंतरंग एकच असते हे मूलभूत तत्त्व म्हणून मान्य केले असावे. त्यामुळे मनुष्याच्या विचारसरणीवर जे परिणाम होतात ते सर्व प्राणिमात्रांच्या हितकारकरच असतात असे आढळून आलेले आहे.