हो शशांक, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. वोनोबांचे 'गीता प्रवचने' हे परंधाम आश्रमाचे प्रकाशन आजही केवळ रू.२५/- मध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख परदेशस्थांना करून देऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी मूळ पुस्तक स्वतः अवश्य वाचायला हवे. पुस्तक मोठे नाही (बुकलेट म्हणता येईल असे आहे.) सोप्यात सोप्या अर्वाचीन मराठीत लिहिलेले आहे. आणि मौलिक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ज्याप्रमाणे महाभारत व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहून घेतले त्याचप्रमाणे, विनोबा धुळ्याच्या तुरूंगात कैद्यांना गीतेची ओळख करून देत असतांना ती साने गुरूजींनी लिहून घेतली. त्यातील निव्वळ तत्त्वसार एवढे आकर्षक आहे की ह्या पुस्तकाची, असंख्य आवृत्त्या निघूनही, लोकप्रियता मुळीही कमी झालेली नाही. व म्हणूनच किंमतही इतर सर्व धर्मग्रंथांप्रमाणेच कमीत कमी आहे.