१) उंदरांना माणसांच्या भावना समजतात असे गृहीत धरले (आणि ते अगदीच असंभव नाही) तर घटनेचा अर्थ वेगळा लागू शकतो.

२) उंदीर हे गणपतीचे वाहन समजले जात असल्याने उंदराला हाकलतांना व त्याला वीष घालतांना घरांतल्या माणसांच्या नेणीवेंत कुठेतरी अपराधीपणाची भावना असण्याची शक्यता आहे. तीच भावना पुढे जाणीवेंत आली. उंदीर विषामुळे अर्धमेला झाला असल्यामुळे हलू शकत नव्हता. त्याचा काही काळाने झालेला मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता. घरांतील लोकांनी या सर्वांची सांगड घालून वरवर पाहता सुसंगत वाटणारी गोष्ट तयार केली व पश्चात्तापाचे अश्रू ढाळून अपराधीपणाच्या भावनेचा निचरा करून घेतला.  

(वरील दोन मुद्दे वेगवेगळे आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही.)