केम्द्र सरकारने तसं जाहीर केलं आहे व त्या दिवशी वंदे मातरम् ची २ कडवी/संपूर्ण म्हणावीत असे आदेश विविध राज्य सरकारानी काढले -

        केंद्र सरकार " वंदे मातरम् " बद्दल एवढे सक्रीय असतांना दुसरी एक बातमी वाचली ती अशी - जम्मू काश्मीर सरकारने कोणतीही अधिकृत सूचना जारी केली नसतांना त्या प्रदेशातल्या पूंछ जिल्ह्याचे आयुक्त प्रमोद जैन यांनी ' भारत माता की जय ' अशी घोषणा देण्यावर बंदी घातली आहे आणि हा हुकुम न जुमानता जर कोणी भारतमातेचा जयजयकार करू धजावेल त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल असेही जाहीर केले आहे. त्याच बातमीत म्हटले आहे की ह्या आदेशाचे राष्ट्रीय स्तरावरील आढळणारे मौन अस्वस्थ करणारे आहे. (संतकृपा , स्प्तें. २००६ पान ४९)
     बातमी जर खरी असेल दोन गोष्टीमध्ये किती विसंगती आहे.