गणेश विसर्जनापर्यंत थांबून मगच उंदराने प्राण सोडला ही माझ्या मते श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे.

ज्याला आपण बुद्धीचं दैवत मानतो त्याचेच भक्त जर बुद्धी गहाण ठेवून अशी अंधश्रद्ध विधानं करत असतील तर ते गणपतीचंच दुर्दैव म्हणावं लागेल! ;)

बा गजानना, बुद्धी दे रे तुझ्या भक्तांना!

तो गणेशमूतीर्, आरास, फळे-फुले यांना काही इजा करेल अशा भीतीने त्या उंदराला आम्ही 'रॅट किल' खायला घातले.

का बरं? तो तर गणपतीचे वाहन आहे ना? मग गणपतीची आरास, फळे, फुले यांना इजा कशी करेल?? जो त्याच्या विसर्जनापर्यंत केवळ श्रद्धेच्या बळावर जिवंत राहू शकतो, असा श्रद्धावान (!) उंदीर अशी नासधूस करेलच कशी? ;)

तात्या अभ्यंकर - ३.९.२००६

आपल्या श्रध्देच्या आणि अंधश्रध्देच्या व्याख्या वाचल्या. तरीही इतरांनी त्या का मानाव्या? माझा प्रश्न पुन्हा तोच आहे.
अहो मग आपण तरी आपली मतं लोकांनी मानली पाहिजेत असं का धरून चालताय? च्यामारी काय बरोबर, काय चूक, श्रध्दा कुठली अंधश्रध्दा कुठली हे ठरवणारे आपण तरी कोण आणि मी तरी कोण? ज्याला जसं वागायचं तसं वागू दे ना! जे मानायचं असेल ते मानू दे ना!!

माझ्या मताशी पूर्ण विसंगत किंवा माझ्या मतांवर आघात करणारे एखादे मत अंतिम सत्य असू शकेल याची मी जाणिव ठेवीन.

इन्ग्रजी नवाचा आकडा मला नऊ दिसतो, पण टेबलापलीकडल्या माणसाला तो सहा दिसतो. हा दृष्टीकोनातला फरक मी मान्य करीन. 

ही दोन वाक्य अगदी बरोब्बर बोललात साहेब. माझाही आपल्याला अगदी हाच सल्ला.!!

तात्या.
तात्या अभ्यंकर ११.५ २००६

?????