स्वतःला तपासून बघायला लावणारा प्रश्न.
मीही माझे शिक्षण नादारीखाली घेतले आहे. मी समाजासाठी काय करतो?
मला असे वाटते की ज्याने त्याने आपापले काम - नोकरी, व्यवसाय, काहीही... सच्चेपणाने आणि प्रामाणिकपणाने केले तर तीही मोठी समाजसेवाच होईल. मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक राहीन, माझ्या कुवतीप्रमाणे शक्य तितक्या प्रभावीपणे करीन, प्रयत्नात कुचराई करणार नाही.... इतके तरी प्रत्येकाला जमण्यासारखे आहे, नाही का?

माझ्या मैत्रिणीला लोकांना देवबिव काही नसतो हे पटवून देणे हेच खरे समाजकार्य आहे असे वाटते.
असे काही पुसटसे प्रयत्न मनोगतसारख्या भासमान माध्यमात झाले तर त्यावर आभाळ कोसळल्यासारख्या प्रतिक्रिया आल्या होत्या, ते आठवले!