प्रथम तुमच्या कामाला शुभेच्छा.  खरोखरच चांगलं आहे.  आता तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे..

१. "समाजकार्य ही फक्त खूप श्रीमंताची कामे आहेत असे वाटते ?"

 असं नाही वाटत, पण आर्थिक सुस्थिती असली तर इतर (सामाजिक) विचार सुचायला शांतता मिळते असे वाटते.  पण खूप श्रीमंत म्हणजे किती यावर एक वाद होऊ शकतो! 

२. पैशाव्यतिरिक्त कशा प्रकारच्या समाजसेवा करता येतात?

वेळ देणे महत्त्वाचे आहे.  समाजसेवा ही अनेक प्रकारची असू शकते.   आपल्या वेळातून वेळ काढून अगदी मित्रांच्या /शेजाऱ्यांच्या मदतीसाठी जाणारी एखादी गृहिणी देखील एक प्रकारची समाजसेवाच करीत असते असे मला वाटते..  फक्त आपण आपले वर्तुळ किती मोठे करतो त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 

३. नोकरी सांभाळून काय करता येईल ?

मला वाटते कामे सांभाळून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो..  मी स्वतः आमच्या घरी कामावर येणाऱ्या बाईच्या मुलांना शिकवले आहे.  मी स्वतः देखील तेव्हा शिकत असल्याने त्यावर नंतर मर्यादा आल्या.   तेव्हा माझ्या आजोबांनी ते काम केले.  नंतरही आईने पैशाने मदत केली.  माझ्या बहिणीच्या ओळखीने त्यातील हुशार मुलाला नोकरी मिळाली.  माझे वडील त्यांची नोकरी करीत असताना त्यांच्या जुन्या शाळेत सल्लागार म्हणून कार्यकारिणीवर काम करत होते.  माझ्या बहिणीचे सासरे देखील गेली अनेक वर्षे त्यांच्या शहरातील शाळांमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 

आता आम्ही जेथे शक्य तेथे भारतीय सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करतो.   भारताबाहेर असल्याने येथील वृद्ध व्यक्तींना मदत करतो - वस्तू, अन्नदान इत्यादी स्वरूपात.   कर्करोग झालेल्या व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थांना अनेकदा मदत केली आहे.  रक्तदान वगैरे माझा नवरा वर्षातून ठराविक वेळा करतो.  हे सर्व फारच कमी आहे हे माहित आहे, पण ते वाढवण्याची इच्छा आहे.  

 

सुहासिनी