मुलाला उठवण्याआधी त्याचे आई आणि बाबा दोघेही जागे पाहिजेत. मुलाने जर बाबानां झोपलेले पाहिले तर ते उठायला कुरकुर करणारचं. मुलाला उठवण्यासाठी आ‍ई किंवा बाबा जे कोणी जाणार आहे त्याने एक चमचा साखर अर्धा पेला पाण्यात विरघळून त्या गोड पाण्याचा पेला मूलाजवळ न्यावा. मूल कोणत्याही वयाचे असो त्याला प्रेमाने उठवून ते सगळं पाणी प्यायला द्यावं आणि मग उठण्याबद्दल एक चकार शब्दही बोलू नये. पोटात झालेल्या गुडगुडीमुळे मूल दहा मिनिटांच्या आतच उठेल आणि सकाळची कटकटही वाचेल.