सुंदर लेख, दिगम्भा. दोन तीन वेळा सावकाश वाचला. अभियांत्रिकी शिकताना चाललेले गाणे कोणत्या रागातील आहे हे ओळखण्याचा अल्गोरिदम लिहिण्याचा प्रयत्न केला होता ते आठवले. (जे आपल्याला जमत नाही ते संगणकाकरून घेण्याचा प्रयत्न, दुसरे काही नाही.) मुळात रागलक्षणे कशी दिसतात हेच समजले नसल्याने प्रयत्न लगेचच फसला. आता कदाचित जमेल असे वाटते.