संजोप राव, आपल्या प्रतिसादाखातर धन्यवाद. आपले पहिले आणि शेवटले उतारे मला पटतात. तेव्हा तर्काच्याच कसोटीवर स्वधर्म तपासावा लागेल. हे खरेच.

मग स्वधर्माचा अर्थ काय? मनुष्यधर्म? नाही.

स्वधर्माचा अर्थ व्यक्तीधर्म! ज्या श्लोकासंदर्भात ही चर्चा सुरू आहे त्या श्लोकात हाच अर्थ अभिप्रेत असल्याचे विनोबांनी सांगितलेले आहे. इथे धर्म शब्दाच्या जनसामान्यांत प्रचलित असलेल्या अर्थाने धर्म शब्द वापरलेला नाही. निश्चितच तो मनुष्यधर्म म्हणजेच सर्वांसाठी सारखाच हा निष्कर्षही चुकीचा आहे. एवढेच काय पण त्या त्या व्यक्तीसाठीही कालपरत्वे तो वेगळा आहे असे विनोबांच्याच उताऱ्यांमध्ये आपण वाचलेले असेलच.

स्वधर्म म्हणजे स्वतः जगात कसे वागावे ह्याबाबतची नीती. आचारधर्म. तेवढ्यापुरताच विचार प्रथम करावा. आत्म्यासंबंधी विचार नंतर करावा. कारण सध्या खूपच विषय एकमेकांत मिसळून जात असतांना दिसतात. किमान एकएका विषयात/ शब्दाबाबत, त्याच्या अर्थाबाबत सगळ्यांचे आकलन सारखे झाले तर एकमेकांचे शब्द एकमेकांना अर्थ सांगू लागतील.

वेळ सापडेल तसतसे आपले इतरही मुद्दे विचारात घेऊन त्यांचा परामर्ष घेतो.
चर्चा जारी असू देत.