नरेंद्र,
आपले लेखन माझ्याकडून नेहमीच वाचले जाते. किंबहुना मनोगतवरील सर्वच लिखाण नियमितपणे वाचतो. पण प्रतिसाद देणे होत नाही.
खास कारण असे नाही. माझ्याबाबतीत आपले पहिले कारण अधिक जवळचे आहे.
जेव्हा गरज भासते तेंव्हा व्य. नि. तून मन मोकळे करतोच की !
आपण लिखाण करत राहा एवढीच विनंती.
ह्या लेखासंदर्भात..
श्वसन डाव्या-उजव्या आणि दोन्ही नाकपुड्यांतून चालते. त्याचबरोबर श्वसन चालताना ते एकाच नाकपुडीच्या डाव्या-उजव्या-खालच्या-वरच्या आणि कुठेही स्पर्श न करता चालू असते असे वाचल्याचे स्मरते. हे आपण एखादा आरसा नाकपुडीसमोर धरून पडताळून पाहू शकतो.
बाकी खोलात जाणे गरजेचे वाटत नाही. संकल्प कोणत्या श्वसन क्रियेत अधिक सफल होतात वगैरे बाबतही वाचले होते. हाही एक सिद्धीचाच अभ्यास आहे. बरेच साधक येथेच अडकतात असे ऐकून आहे.
आपले लिखाण अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय असते. तळमळीतून केलेले लिखाण असे बंद करू नये असे वाटले म्हणून हा प्रपंच.