निरुपण चांगले असले तरी वाचताना कुठेतरी गल्लत झाल्यासारखी वाटते(कदाचित माझीच असावी)

प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझाही धर्म दहा वर्षांपूर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षांनी टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ती पालटत जाते तसतसा पूर्वीचा धर्म गळत जातो. आणि नवीन लाभत असतो. हट्टाने काहीच करायचे नसते.

इथे धर्म अपेक्षित आहे की कर्म? कारण आज मी नोकरी करतो/ ते उद्या निवृत्ती नंतर वेगळं काही करेन. तेव्हा पूर्वीचे कर्म गळून जाते आणि नवीन लाभते हे पटते.

धर्माबद्दल म्हणायचे झाले तर सत्य आचरण हा धर्म आहे. सहानुभूती हा ही धर्म असू शकतो. तो गळून का पडावा? त्यापेक्षा नविन काय लाभावे?