प्रियाली,
इथे 'मी जगात वागावे कसे' हाच स्वधर्माचा अर्थ निदान त्या श्लोकात तरी अभिप्रेत असलेला दिसत आहे.
धर्माबद्दल म्हणायचे झाले तर सत्य आचरण हा धर्म आहे. >>
मात्र 'नरो वा कुंजरो वा' म्हणतांना धर्मराजाचा धर्म वेगळा राहिला होता.
सहानुभूती हा ही धर्म असू शकतो. तो गळून का पडावा?
त्यापेक्षा नविन काय लाभावे?>>
कवच कुंडले काढून देतांना कर्णाचा धर्मही वेगळाच राहिला होता.
कौरवांप्रतीची सहानुभूती मागल्या स्थानी गेलेली दिसली.