दादरकर,

खूपच छान लिहिलं आहे. आणखी येऊ द्या असे अनुभव.

जनता सहकारी बँकेत एकदा मी टोकन घेऊन बसलेले माझा नंबर यायची वाट बघत आणि अचानक एक मोठे गृहस्थ बँकेत प्रविष्ट झाले. आले तेच शंभराच्या गड्ड्या हातात झेंड्यासारख्या फडकवत ! मोठ्यामोठ्याने विचारत होते की ' आरं बाबानु, कोनाले ह्यो पैका पायजेल का? पायजेल का कोनाले? ' माझ्यासकट बँकेत बसलेले सगळे अवाक् झाले हे काय चाललं आहे पाहून. बँकेतला गार्ड त्यांना मॅनेजरच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि मग सगळं गपगार झालं. माझा नंबर येता मी काउंटरजवळ गेले आणि कॅशियरला याबद्दल विचारलं असता कळलं की हा नेहमीचाच प्रकार होता आणि तो खातेधारक नेहमीच असा प्रवेशतो बँकेत !