मी लहानपणी पृथ्वीवर माणूस उपरा वाचून अशीच काहीशी प्रेरित वगैरे झाले होते. नंतर एरिक वॉन डॅनिकेन यांचे मूळ चॅरिऍट्स ऑफ द गॉड्स ही वाचले. त्यानंतर टीव्हीवर त्याच्या मतांचे खंडन करणारे अनेक कार्यक्रम पाहिले. पाश्चात्य जगात डॅनिकेन हा fraud समजला जातो.

स्वतः डॅनिकेन यांनी अमेरिकन नॅशनल टीव्हीवर (जॉनी कारसन शो) आपण पुस्तकाचा खप वाढावा म्हणून बऱ्याच गोष्टी ठोकून दिल्याचे मान्य केले आहे. त्यात परग्रहावरील अंतराळवीर, इजिप्तच्या पिरॅमिड्स बद्दलची बरीचशी माहीती इ. अंतर्भूत आहे.

आपल्या पुस्तकात त्यांनी दिलेल्या एका चित्रात पुरातन मातीच्या भांड्यांवर अंतराळ वीरांचे चित्र मिळाल्याचा दावा केला आहे. याचा अधिक शोध घेतला असता तज्ज्ञांना ही भांडी घडवणारा कुंभारच मिळून गेला. हे पुस्तक जेव्हा प्रथम लिहीले गेले तेव्हा त्याला कोणीही प्रकाशक हात लावण्यास तयार नव्हता. डॅनिकेनने एका सायन्स फिक्शन लिहीणाऱ्या लेखकासोबत बसून संपूर्ण पुस्तक पुन्हा लिहून काढले आणि "प्रसिद्ध" केले.

मी सर्वच मुद्दे चुकीचे आहेत असे म्हणत नाही किंवा  डॅनिकेनने सांगितलेले सर्वच पुरातन पुरावे खोटे आहेत असा नाही. पण भयंकर exaggerated आहेत. सर्वच उदाहरणांचे आत्ताच खंडन करू शकत नाही. परंतु जे आठवतात ते असे --

नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा.

हे कुठेही सिद्ध झालेले नाही. केवळ डॅनिकेनच्या सुपीक डोक्यातली कल्पना. विमान उतरावे अशा या धावपट्ट्या नाहीत. तर पायवाटा आहेत. त्या तत्कालिन लोकांच्या rituals साठी ज्या मिरवणूका होत त्यामुळे तयार झाल्या हे सिद्ध केले गेले आहे.

ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही.

अगदीच खोडसाळ आणि हास्यास्पद मुद्दा. राम आणि कृष्ण यांची शरीरे निळ्या रंगाची होती असे म्हणण्यासारखा. या पुतळ्यांची आणि इस्टर आयलंडच्या आत्ताच्या नागरीकांचीही चेहरेपट्टी निरखून पाहीली तर हा मुद्दा उठायचे कारण नाही.

प्राचीन संस्कृतींचा प्रवास, देवाण घेवाण होती. कला, संस्कृती, स्थापत्त्यशास्त्र इतकेच नव्हे तर रोटी-बेटी देवाण घेवाणही आढळते. बरीचशी माहीती अजूनही अंधारात आहे. परंतु अचानक हॉटेलचा व्यवसाय सोडून डॅनिकेनने एका पुस्तकाद्वारे केलेले संशोधन पुरेसे नाही. सनसनाटी मात्र आहे. वरील उदाहरणे तज्ज्ञांकडून तपासली गेली असता हे सर्व परग्रहावरून आलेल्या माणसांमुळे झाले याचा सबळ पुरावा डॅनिकेन स्वतःही देऊ शकत नाही.

डॅनिकेनच्या पुस्तकाचे खंडन करणारे  दोन दुवे अधिक माहीतीसाठी देते.

दुवा १

दुवा २

 या व्यतिरिक्त बरीच माहीती महाजालावर उपलब्ध आहे.