डिस्कव्हरी आणि NGC नित्यनियमाने पाहत चला. त्यावर नाझ्का, पॉलिनेशिअन बेटे, पिरॅमिड्सची बांधणी यावर कार्यक्रम येतात. त्यात तत्कालिन लोकांनी कुठली यंत्रे, सुविधा वापरून, किती मजूर लावून ही निर्मिती केली त्याचे विस्तृत स्पष्टीकरण मिळेल.

डॅनिकेनचे पुस्तक हे खरंच लाजवाब आहे त्यामुळे तुमच्यावरचा "असर" उतरण्यास थोडा काळ लागेल. नाहीतर, नाझकाच्या बाबतीत त्या धावपट्ट्या वाटु शकतात. हे विधान तुम्ही करणार नाही. (असो. दोष देत नाही हं, काही वर्षांपूर्वी मी ही असेच विधान केले असते.)

डॉ. हवास म्हणून इजिप्शिअन पुरात्तत्व वेत्त्यांचे कार्यक्रम पाहण्यासारखे असतात. पिरॅमिड बांधणीवर त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळाले तर चुकवू नका. इतर तज्ज्ञांपेक्षा थोडे "हटके" मुद्दे टाकतात. रोचक असतात पण परग्रहावरचे claims नाहीत.

फक्त खगोलशास्त्र आणि गणितशास्त्र याच विषयांमधे ही लोकं निष्णात कशी काय?

तसं नाही. इतर शोधांची माहीती नाही. किंवा जाणून बुजून दिलेली नाही. युद्धशास्त्र, आरोग्यशास्त्र, दळण-वळण, स्थापत्यशास्त्र आणि अनेक शास्त्रांत जुने लोक पारंगत होते.