ड्रायोपिथेकसची माहिती हा सिद्धांत नव्हे तर एक शक्यता होती. ती केव्हाच निकालात निघाली आहे. एका पूर्वजापासून माणूस आणि चिंपान्झी उत्क्रांत झाले आणि त्या पूर्वीच्या एका कपिपासून गोरिला व हा पूर्वज उत्क्रांत झाले अशी मान्यताप्राप्त वंशावळ आहे. रेण्वीक पुरावे (DNA जुळवणी वगैरे) हीच वंशावळ दाखवतात. माणसाचे व चिंपान्झीचे ९८% डीएनए सारखे आहेत. तेव्हा आलेच असतील तबकडीतून तर सगळे मिळून (तिकडे उत्क्रांत होऊन) आले असतील. (तसेही नाही कारण माणसाच्या आणि उंदराच्या डीएनए मध्ये देखील साम्य आहे!)

मांसाहारी प्राणी निर्माण होताना मांजर,रानमांजर,वाघ ( तॄणाहारी मधे झेब्रा,घोडा,गाढव )ई. एकमेकांसदृश अनेक प्राणी निर्माण झाले. परंतू मानव निर्माण होताना मानवाला समांतर प्राणी नाही झाला.

कपि मानवाला समांतर आहेत. आणखी म्हणजे बिनकेसांचे निआंडरथल जे आता नामशेष झाले आहेत. (हत्तीला समांतर प्राणी कुणाला दिसतो आहे का? का तेही तबकड्यांतून आणले?)

जगातील सर्व प्राणी निशाचर अथवा दिनचर अशी वैशिष्ट्ये घेउन येतात. मानवाला तेही नाही.

मानव दिनचर प्राणी आहे. रात्रीच्या मिट्ट काळोखात आपल्याला फारसे दिसत नाही. ऐकण्याची शक्ती (वटवाघूळ इ प्रमाणे) प्रगत नाही.

आहाराच्या बाबतीत मांसाहारी, शाकाहारी, तॄणाहारी, कीटकाहारी ई. वैशिष्ट्ये आहेत. मानवाला नाहीत.

चिंपान्झी हा मानवाचा जवळचा नातलग हे एक उदाहरण पुरेसे ठरावे. चिंपान्झी सगळ्या प्रकारचे अन्न खातात. दाणे, पाने, फळे, मांस, अंडी वगैरे. इतर प्राणीसृष्टीतही अशी अनेक उदाहरणे आहेत, उदा. अस्वल फळे, मध, मासे इ खाते .

संरक्षणासाठी प्राण्य़ांना शिंगे,दात,नखे, अशी आयुधे जन्मतः लाभली आहेत. मानवाला नाहीत.

ज्या गोष्टींची गरज नाही त्यांना सोडून देण्याची काटकसर उत्क्रांतीत नेहमीच घडते. आपल्या चिंपान्झी बांधवांना देखील शिंगे, दात, नखे इ नाहीत. ते टोळीने, व्यवस्थित डावपेच लढवून शिकार करतात.

कोणत्याही प्राण्याचे अपत्य अल्पकाळात स्वतंत्रपणे जगू लागते. मानवाचे मात्र वर्षानुवर्षे आई-बापांवरच अवलंबुन पराधीन जिणे जगत असते.

याचे कारण म्हणजे मानवाला लागणारा मोठा मेंदू. आणि मानवाचे द्विपादन. दोन पायावर उभे राहिल्यामुळे मातेच्या पोटात किती मोठे बाळ राहील यावर मर्यादा आली. आणि उत्क्रांतीच्या दबावात मेंदू मात्र मोठा मोठा होत गेला. चिंपान्झी बाळे देखील ५, ६ वर्षे आपल्या मातेवर अवलंबून असतात. त्याचेच लांबवलेले रूप म्हणजे माणसाची बाल्यावस्था.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व प्राणी फ़क्त वर्तमानकाळात जगत असताना मानव हा एकच प्राणी असा आहे, की जो कोणतीही शारीरिक कुवत नसताना

कोणतीही शारीरिक कुवत नाही!!?? कमाल आहे.

सगळे प्राणी आपापला वंश पुढे चालावा म्हणून प्रयत्न करतात. हे निसर्गतःच घडते. तसेच माणूसही करतो. प्राणी फक्त वर्तमानात जगतात असे हे लेखक महाशय कशावरून म्हणतात? त्यांनी काय अभ्यास केला आहे? मी वाचलेल्या माहितीनुसार चिंपान्झी टोळ्या पद्धतशीररित्या प्रतिस्पर्धी टोळीतील नरांना ठार करतात, माद्यांना आपल्या टोळीत सामील करून घेतात. आपला वंश वाढवतात. 'भविष्यात' आपल्याला फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन टोळीतील सगळे नर लढाईत, डावपेचात भाग घेतात. प्रसंगी प्राणावर बेतले तरी!

मी सगळीकडे चिंपान्झीची उदाहरणे देते आहे कारण एक तर ते माणसाचे जवळचे नातलग आहेत आणि (म्हणूनही) त्यांचा बराच अभ्यास झाला आहे. इतर प्राण्यांतही अशी उदाहरणे असण्याची शक्यता आहे.