हे पुस्तक वाचून मीही बराच प्रभावित होऊन आपण 'एलियन"आहोत अशा धुंदीत वावरत होतो

कुशाग्र हे आपण कदाचित विनोदाने म्हणत असाल पण शाळेत असताना मला ही अशी पुस्तकं आपण परग्रहवासीच आहोत असं वाटायचं. पुढे प्रत्येक गोष्टीला कमीत कमी दोन  बाजू असतात असा साक्षात्कार झाला आणि हे खूळ हळू हळू कमी झालं. ;) (ह. घ्या)

मृदुलाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ?

आता हा एक मुद्दा. रिओ च्या जवळ इजिप्तसारखा दिसणारा स्फिंक्स नाही. दगडात कोरलेला एक राक्षसी चेहरा आहे आणि चित्रलीपी आहे हे खरे. या चित्रलीपीतील काही अक्षरे फिनिशिअन लिपीशी साधर्म्य दाखवतात. पण ती जशीच्या तशी नाहीत. (मी स्वतः ती पुस्तकात पाहिली आहेत. दुर्दैवाने मला पुस्तकाचे नाव आता आठवत नाही. मिळले तर नमूद करेन) केवळ काही अक्षरांच्या साधर्म्याने इतका संबंध प्रस्थापित करणे योग्य नाही (पण साधर्म्य आहे हे सत्य)


स्फिंक्स बद्दल बोलायच झालं तर इजिप्तच्या स्फिंक्सवरील चेहरा मा. रशमोरच्या चेहऱ्यांशी अधिक साधर्म्य दाखवतो. अजून शे पाचशे वर्षांनी त्यांचा संबंध जोडायला हरकत नाही. (ह. घ्या)